कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.त्यात 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे.या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.या बैठकीनंतर विशेष स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलीय.यात आमरस, पुरणपोळी सारख्या पक्वान्नांचा समावेश आहे