पुण्याच्या बारामती मध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झालाय ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, अशातच बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक शेजारील तीन इमारती पावसानं खचल्या आहेत. या इमारतींची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी केली जात आहे. साईरंग,ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी या इमारतींची नावे आहेत. बचाव दल घटनास्थळी पोहोचलं असून.. सद्यस्थितीत सर्व इमारतीमधील फ्लॅट हे रिकामे करण्यात आले आहेत.