मिरा भाईंदरमध्ये लुटेरी दुल्हन' गजाआड करण्यात आली.. लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाला लुटणाऱ्या एका टोळीला काशिमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच घरातील दागिने आणि लॅपटॉप घेऊन पळून गेलेल्या 'नवरी'सह तिच्या साथीदाराला पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अटक केली.. या टोळीने मुंबई, नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही अनेकांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघड झालंय.. तर 4 लाख 76 हजारांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.