Akola Heat Wave| उष्णतेचा कहर, पारा 43.1 अंशांवर; घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

देशात आजही महाराष्ट्र 'हॉट' ठरतोय.. त्याच कारण म्हणजे राज्यभरात आज तापमानाचा पारा वाढल्याचं पाहायला मिळालं.. तिकडे अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागलीय.. अकोल्यात तापमानाच्या पारा 43.1 टक्केपर्यंत पोहोचलाय. आज सकाळीही तापमान ४० अंशांवर नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान विभागाने १६ तारखेपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने नागरिकांची मोठी हालचाल दिसून येत आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ