अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून तापमानात वाढ झालीय.. अहिल्यानगरचं तापमान 37 अंशापर्यंत वाढलंय... येत्या काळात हे तापमान 40 अंशाहून अधिक जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय.. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ओ.आर.एस., लस्सी, ताक, कैरीचे पन्हे व लिंबू पाण्याचा नियमित वापर करावा...तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी डोके टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा.त्याचबरोबर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये शीत केंद्र उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.. दरम्यान, शहरात आता रहदारीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय.. तर वाहतूक देखील कमी झालीय.