वर्ध्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आलाय.. वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी देण्यात आलीय.. तापमान 43 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचा निर्णय घेतलाय.