एकीकडे ठाकरेंना आमंत्रण दिल्यानं भाजप नाराज असतानाच आता ठाकरे गटही मनसेच्या प्रतिसभागृहात सहभागी होणार नसल्याचं दिसून येतंय.याबाबत किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. आदित्य ठाकरेंचे नियोजित कार्यक्रम असतात.1 दिवस आधी कळवाल तर आम्ही कार्यक्रम रद्द करू शकत नाही.असं किशोरी पेडणेकर यांनी मनसेच्या आमंत्रणावर म्हटलंय.तर मनसे ठाकरे गटासोबत युती करत असेल तर आमची हरकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय. मनसेनं ठाकरे गटाला दिलेल्या आमंत्रणावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.