भाजपच्या गटनेते पदाबाबत बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर मोदी जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असं दीपक केसरकरांनी सांगितलंय. वरिष्ठ नेते बोलवतील तेव्हा राज्यातील तिन्ही नेते दिल्लीला जातील असंही दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय तर एकनाथ शिंदे नाराज नाहीत असंही यावेळेला दीपक केसरकरांनी म्हटलंय.