मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार आल्यानंतर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केलंय.. निलेश राणे यांना या भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग आढळून आली आहे. त्यानंतर निलेश राणे हे अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील काढला आहे. एवढंच नाही तर आणखी पैशांच्या तीन ते चार बॅगा असल्याचा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली असून, आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंसाठी देखील पैसे वाटले होते, असा दावा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी केलाय.. तर पैसे वाटपाचा आरोप धादांत खोटा असल्याचं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय..