Mumbai Breaking News | मुंबईत 36 तासांत 8 मुलींसह 12 अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून High Alert

मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील ३६ तासांत शहरातून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, हे मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्य लक्षात घेता 'हाय अलर्ट' जारी केला असून, मानव तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ