मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, सीएसएमटी आणि दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते बंद झाले आहेत. हजारो आंदोलक आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमले आहेत, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई पोलिसांनी लोकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.