मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईत दाखल झाल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणारे सर्व मार्ग बंद असून, मुंबई पोलीस आयुक्तालय आणि चर्चगेट स्टेशनकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. या बदलांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि पोलिसांकडून घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा हा विशेष रिपोर्ट. दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल.