मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मध्यरात्री महत्त्वाची बैठक झाली. कायदेशीर सल्लागारांच्या उपस्थितीत उपसमितीने आरक्षणाबाबत पुढील रणनीतीवर चर्चा केली.