मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर हाके यांनी केलेल्या टीकेमुळे मराठा तरुण संतप्त आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.