मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे. अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सध्या ही चौकशी सुरू आहे. अभिनेता दिनो मोरयाला आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलं होतं. मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात त्याची चौकशी सुरु आहे.