मुंबईतनं तुम्ही जर पुण्याच्या दिशेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून पुण्याकडे जाताना तुम्हाला घाटात कधी अर्धा तास कधी तासभर थांबावं लागतं. मात्र आता तुमची या नित्याच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुढच्या पाच महिन्यामध्ये मुंबई ते पुणे हा प्रवास हायटेक आणि सुपर फास्ट होणार आहे. महायुती सरकारचा महत्वाकांक्षी मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा आता शेवटच्या टप्प्यात आला. या शेवटच्या टप्प्यात केबल स्टेट ब्रिज च कामही सुरू आहे. कसा आहे हा मुंबई पुणे मिसिंग लिंक आणि केबल स्टेट ब्रिज नेमका कसा असणार आहे पाहूयात ड्रोन च्या माध्यमातून. नमस्कार एनडीटीव्ही मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी देवेंद्र कोल्हटकर सध्या महाराष्ट्रात विकासाचे विविध प्रकल्प सुरू आहेत आणि यातीलच एक महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित प्रकल्प म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावरील मिसिंग क्लीन प्रोजेक्ट ओळखला जातो.