Mumbai Rain updates| कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल भागात जोरदार पाऊस; मुंबईचा वेग मंदावला

मुंबईत सध्या कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल या भागात पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील काही तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.मुंबईकरांना सकाळी मुसळधार पावसाने सुरुवात होऊ शकते.हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की पुढील काही तासांत सातत्याने पाऊस सुरू राहू शकतो.पावसाच्या तीव्रतेमुळे शहरातील काही खालच्या भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.बीएमसीने नागरिकांना आवाहन केले आहे की अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे.काल रात्री मुसळधार पावसामुळे काही क्षेत्रात पाणी साचल्याचे दिसून आले होते.

संबंधित व्हिडीओ