रामनवमी निमित्ताने नागपूर शहरात दरवर्षी प्रमाणे आज दोन शोभायात्रा निघणारेय.पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या मुख्य रामनवमी शोभायात्रेत 90 हून अधिक चित्ररथ सहभागी होतील.दुपारी 4 वाजता पोद्दारेश्वर राम मंदिरापासून शोभायात्रा निघणार.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, पश्चिम नागपुरात रामनगर हनुमान मंदिरापासून निघणाऱ्या शोभायात्रेचे देखील विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.