कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. त्यात 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे..या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय चकाचक करण्यात आलंय.. बैठकी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची साफ सफाई करण्यात आलीय.