नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा तालुक्यात काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री 10 वाजून 1 मिनिटांनी अचानक भूगर्भातून मोठा आवाज येत जमीन हादरू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.काही घरांच्या भिंतींना तडे गेले, तर घरातील भांडीही पडल्याची माहिती आहे.भूकंपाचे केंद्रबिंदू मानल्या जात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील भनवड गावात महिलांनी त्या भीषण क्षणांचा थरार सांगितला.महिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी