Nashik| कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.त्यात 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.आज दुपारी 12 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉग क्वॉड़ही आणण्यात आलंय.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय चकाचक करण्यात आलंय.बैठकी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची साफ सफाई करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ