New India Cooperative Bank case | आरोपी हितेश मेहताच्या ब्रेन मॅपिंगचा अहवाल समोर, मोठी अपडेट

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक प्रकरण आरोपी हितेश मेहताच्या ब्रेन मॅपिंगचा अहवाल समोर आलाय.या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली.बँक महाव्यवस्थापकासह इतर आरोपींचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झालाय.तीन तास हितेश मेहता याची ब्रेन मॅपिंग चाचणी सुरू होती.त्याचा अहवाल आता आर्थिक गुन्हे शाखेला मिळालाय.यात मेहतासह इतर आरोपींचाही अपहारात समावेश असल्याचं समोर आलंय. बँकेचा माजी अध्यक्ष हिरेन भानू, बिल्डर धर्मेश पौन, व्यवसायिक अरूणाचल उन्ननाथन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोअल यांचा गुन्ह्यात सहभाग होता.याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.

संबंधित व्हिडीओ