वैष्णवी हगवणे मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट येतीय.आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी चौकशी केलीय. त्याचबरोबर त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आलेत.तब्बल दीड तास तास चौकशी झाल्यानंतर पोलीस निलेशला घेऊन परतलेत.यात निलेशच्या घरी लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय.त्याचबरोबर इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देखील पोलिसांनी जप्त माहिती मिळतीय.तर दुसरीकडे निलेश चव्हाणला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. दहा दिवसांपासून आरोपी नीलेश चव्हाण हा फरार होता.. त्याला काल नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली.त्यानंतर त्याला तीन जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.