परभणीच्या इक्बालनगरमध्ये दगडफेकीची घटना घडलीय.दोन लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचं रूपांतर दगडफेकीत झालंय.या दगडफेकीत दहा ते बारा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.दरम्यान, इकबाल नगर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. तर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अफवा पसरवणाऱ्या वर कडक कारवाईचा इशारा दिलाय.. त्याचबरोबर शांतता बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे.