नाशिकच्या बोरीची बारी गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे.हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव मूठीत धरुन 35 फूट खोल विहीरीत उतरावं लागतंय.पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष अद्यापही संपण्याचं नाव घेत नाहीय.हंडाभर पाण्यासाठी अक्षरश: जीवाची बाजी लावत महिलांना खोल विहिरीत उतरावं लागतंय. पाय निसटला, तर थेट कपाळमोक्ष होण्याची भीती असतानाही या महिला आपल्या लेकरा-बाळांसाठी दररोज जीव धोक्यात घालतायत.स्वातंत्र्याची पंचहात्तरी साजरी केलेल्या देशातील नागरिकांना अद्यापही पाण्यासारख्या मुलभूत सुविधांसाठी झुंजावं लागतंय. यांच्या घरी पाण्याचा थेंबही नसला तरी त्यांच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जातंय.