पुण्यातील भाजपच्या प्रमोद कोंढरेंनी शहर महामंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलीसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरिक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकार्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासलं, यानंतर राजकीय स्तरातून टीका केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर न राहण्याची भूमिका घेत प्रमोद कोंढरेंनी राजीनामा दिलाय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावर ट्विट करत निषेध नोंदवलाय.. पण प्रमोद कोंढरेंना अटक कधी करणार असा सवाल विचारला जातोय...