वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल संध्याकाळ पासून बरसत जोरदार पावसाने नदी नाले आता चांगलेच भरून वाहत आहे.अनेक ठिकाणी या पावसाने नुकसान झाल्याचं समोर येत आहे.मुंगळा गाव परिसरात असलेल्या 25 वर्षे जुन्या पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने तलावा शेजारी असलेल्या 8 ते 10 शेतकऱ्याचं नुकसान झालंय.सांडवा जर्जर झाल्या बाबत शेतकऱ्यांनी दुरुस्ती संदर्भात निवेदन देऊन देऊन ही दुरुस्ती न केल्याने पहिल्याच पावसात पाझर तलावाचा सांडवा फुटल्याच समोर आलंय.