Pune| भावे हायस्कूलजवळ भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना उडवलं, अपघाताप्रकरणात लेटेस्ट अपडेट काय?

पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कार ने 12 जणांना उडवलं होतं. या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाईल...दरम्यान जखमींपैकी दोन जण स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आहेत.एकूण घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी

संबंधित व्हिडीओ