Pune Crime News| भावे हायस्कूलजवळ नेमकं काय झालं? सध्याची अपडेट काय? NDTV मराठीने घेतलेला आढावा

पुण्यात भीषण अपघाताची घटना घडलीय.कारचालकानं बारा जणांना उडवलंय. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळतीय. आज या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससीची परीक्षा होती.दरम्यान या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.पुण्यातील भावे हायस्कूलजवळ हा अपघात घडलाय.कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती मिळतीय.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.दरम्यान आज आरोपीला विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ