पुणे महापालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याने महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलाय.संबंधित अधिकाऱ्याने चेहऱ्यावर तेज दिसावे आणि चेहरा टवटवीत राहावा म्हणून तब्बल 9 लाखांचं इंजेक्शन घेतलं.एवढंच नाही तर त्यांनी या इंजक्शनचं बील पालिकेकडून घेण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराची बोंबाबोंब होऊन बदनामीची होण्याच्या शक्यतेने त्यांनी नंतर या खर्चाची बिले मागे घेतली.. दरम्यान, आरोग्य विभागाने ही बिलं मंजूर केली नाहीत, पण या प्रकाराची चर्चा मात्र रंगलीय.