पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या कॉल सेंटर वर छापा टाकत कारवाई केली. खराडी मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत या इमारतीतनं हे बनावट कॉल सेंटर चालवलं जात असल्याची माहिती आहे. यामध्ये कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं.