हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शिंगी नागा येथील शेतकऱ्यानं पंधरा क्विंटल हळद वाळत घातली मात्र काल दुपारपासून आज सकाळपर्यंत अवकाळी पाऊस पडत असल्यानं संपूर्ण हळदीवर पाणी साचलं. काही हळद पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.