पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी जवळपास दीड तास लागतायत.. पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्याचाही फटका वाहतूक कोंडीला बसतोय...