बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.