मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा घसा कसा बरा झाला, त्याची सध्या मुंबईत जोरदार चर्चा आहे.एका जैन मुनींच्या आशीर्वादानं आपला घसा बरा झाला, असं रितू तावडे म्हणाल्या... त्यानंतर रितू तावडेंच्या घशावरुन जोरदार राजकीय खवखव सुरू झाली... यावर टीका करताना संजय राऊतांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं.त्यानंतर हा सामना राऊत विरुद्ध तावडे असा सुरू झाला. पाहुया काय आहे ही मुंबईतली नवी राजकीय स्टोरी.