Sangli Crime News | सांगलीत मद्यधुंद कारचालकानं 4 ते 5 जणांना उडवलं, कारची नागरिकांकडून तोडफोड

सांगलीत मद्यधुंद कारचालकाकडून चार ते पाच जणांना उडवल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चारचाकीची तोडफोड केलीय... बालाजी मिल रोडवर हा प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद कारचालकाने दुचाकी वाहनधारक आणि पादचाऱ्यांना धडक दिली.. .यात चार ते पाच जण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करत चारचाकी वाहनाची तोडफोड करत बेधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे,या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे मध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगली हादरून गेले आहे.

संबंधित व्हिडीओ