खासदार संजय राऊत यांनी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची पाहणी केलीय.गुलमोहर विश्रामगृहातील 102 नंबर ची खोली पर्यटकांसाठी खुली करा, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.खासदार संजय राऊत हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांची बैठक धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी पार पडली.यानंतर त्यांनी ज्या खोलीत 1 कोटी 84 लाखांची रोख रक्कम सापडली.त्या खोलीची पाहणी केली.