आदिशक्ती संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान झाले आहे. यंदा या पालखी सोहळ्यात आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली आहे ती म्हणजे 'सोन्या-मोन्या' ही मानाची बैलजोडी. चांदीचा भव्य रथ ओढण्याचा मान मिळालेल्या या देखण्या बैलजोडीला सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांनी आणि पारंपरिक अलंकारांनी अतिशय देखणे सजवण्यात आले आहे.