Sindhudurg Rain News| तळ कोकणात शेती कामांना वेग, दमदार पुनरागमन करत जोरदार बॅटिंग सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर आज पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन करत जोरदार बॅटिंग सुरू केली आहे... गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज जिल्हाभरात जोरदार हजेरी लावत शेतकरी आणि नागरिकांना सुखद दिलासा दिला आहे.. काळ्या ढगांच्या गर्दीसह सुरू झालेल्या या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ