Kalyan हादरलं, कोळशेवाडीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर पुन्हा अत्याचार; 55 वर्षांचा आरोपी ताब्यात

कल्याणमध्ये महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीय.कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीवर ५५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे, तर या प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे भाजप, ठाकरे गट, मनसे आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली आहे. सतत वाढणाऱ्या अशा गुन्ह्यांमुळे कल्याणमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित व्हिडीओ