Beed| विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड; SIT गठीत, IPS वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली तपास

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.या प्रकरणाच्या तपासासाठी आता विशेष तपास पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली असून,ही SIT IPS अधिकारी वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे.घटना गंभीर स्वरूपाची असल्यामुळे तपास SIT कडे वर्ग करून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसंच, पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर आलं असून या अँगलनेही तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

संबंधित व्हिडीओ