आज विधानभवनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे समोरासमोर आले. इतकच नव्हे तर दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं आणि नितेश राणेंनी चक्क आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली. विधानभवनातल्या माध्यमांच्या पोडियमवर बोलून आदित्य ठाकरे परत जात असताना हा प्रकार घडला. ठाकरे आणि राणे कुटुंबामधे असलेले राजकीय संबंध पाहता, झाल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.