शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. पवारांच्या पक्षाच्या आठ खासदारांचे प्रश्न आहेत. त्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची वेळ घेतली आहे आणि ते भेटणार.. ज्या काही शंका या भेटीवरून आहेत त्या पुसून टाका. कारण शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत असंही राऊतांनी म्हटलंय.