घराजवळच्या शेतात खेळत असताना चार वर्षीय मुलगा विहीरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली.शिर्डी जवळील सावळीविहीर खुर्द येथिल ही घटना असून अनय श्रीकांत वर्पे वय वर्षे चार असे मुलाचा नाव आहे.सावळीविहीर येथिल अजिंक्यनगर भागात राहणाऱ्या श्रीकांत वर्पे यांचा मुलगा असून तो साडेचार नंतर दिसेनासा झाला.. त्यानंतर त्याची शोघाशोध केल्यानंतर त्याची एक चप्पल विहरीच्या कडेला तर एक पाण्यात आढळून आल्याचं सांगीतल जातय.त्यानंतर पोलीस आणि शिर्डी येथिल रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून तीन तासापासून शोध मोहीम सुरु असल्याचं दिसून येतय.. विहीरीत पाणी प्रचंड तसेच आत गाळ मोठ्या प्रमाणात असल्यानं रेस्क्यूटीमला मोठी अडचण येतय.. दोन ट्रक्टर मोटार तसेच इतर पाणी मोटारच्या साहायाने पाणी उपसा केला जातोय मात्र पाण्याची पातळी खाली जात नसल्याचं दिसून येतय.