घराजवळच्या शेतात खेळत असताना चार वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली... शिर्डीजवळील सावळीविहीर खुर्द इथं ही घटना घडली.. अनय श्रीकांत वर्पे हा चिमुकला बेपत्ता झाल्यानंतर त्याची शोधाशोधा करण्यात आली.. मात्र विहिरीच्या कडेला त्याची चप्पल आढळल्याने पाण्यात पडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.. त्यानंतर त्याचं शोधकार्य सुरु करण्यात आलं.. साडेचार तासाच्या शोधकार्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह हाती आलाय.