पुण्यात ८ वर्षीय तरुणीचा अनोखा विक्रम, केवळ छत्रपती आणि स्वराज्याच्या प्रेमापोटी १२२ गड किल्ले केले सर आपल्या प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवरायांबद्दल आदर आहेच.. पण शिवप्रेमाचं म्हणाल तर बच्चे कंपनीही यात काही कमी नाही.पुण्यातील एक ८ वर्षाची चिमुकली शार्विका म्हात्रे हीने शिवप्रेमापोटी एक अनोखा विक्रम केलाय. आत्तापर्यंत तिने तब्बल १२२ गडकिल्ले सर केले आहेत.. इतकंच नाही तर या तरुणीने या सर्व किल्ल्यांवरची माती सोबत आणून ती आपल्या आठवणीत जतन देखील केली आहे.. एवढ्या लहान वयात गडकिले सर करताना तिचा अनुभव कसा होता हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी..