Shivjayanti Special| शिवसृष्टीसाठी 50 कोटींचा निधी देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा| NDTV मराठी

पुण्याच्या आंबेगाव भागात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय.शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मागील वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते झाले होते. आता दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी 87 कोटी रुपये खर्च आलाय..शिवसृष्टीच्या या दुसऱ्या टप्प्यात फिरते सभागृह हे मुख्य आकर्षण असणार आहे. 360 अंशांमध्ये हे सभागृह प्रेक्षकांना घेऊन फिरत राहणार असून 36 मिनिटांचा शो या फिरत्या सभागृहात दाखवण्यात येणार आहे . रामराज्य ते शिवराज्य अशी या शो'ची संकल्पना आहे. प्रेक्षकांसाठी हा टाइम मशीनमध्ये बसण्यासारखा अनुभव असणार आहे. रामराज्य ते शिवराज्य या शकडो वर्षांच्या इतिहासाचे टप्पे प्रेक्षकांना 36 मिनिटांत अनुभवता येणार आहेत. या शो'साठी नागरिकांना सहाशे रुपये तिकीट आकारण्यात येणार असून महापालिका शाळांमधील दोनशे रुपये सवलतीच्या दारात तिकीट उपल्बध असणार आहे. या शिवसृष्टीचे एकुण चार टप्पे असून त्यासाठी चारशे कोटींहुन अधिक खर्च येणार आहे.

संबंधित व्हिडीओ