कोस्टल रोडचं 94 टक्के काम पूर्ण झालं असून या रस्त्यासाठी 15 हजार कोटी खर्च आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.दरम्यान कोस्टल रोडवरून कुणाला श्रेय घ्यायचंय त्यांना घेऊ द्या.. उद्या ते बोलले ताज आम्ही बांधला तर मान्य करायचं का.. असं म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय.तर प्रकल्पात कोणी खोडा घालणाऱ्यांनी श्रेयवादाची भूमिका मांडू नये असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.