सिंधुदूर्गात कणकवलीत जरी राणे विरुद्ध राणे असा राणे बंधूंमधला सामना रंगला असला तरी या वादाचं सावट मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीवरही आहे. कारण इथे भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. पण लढत जरी तिरंगी असली तरी खरी चुरस सत्ताधारी महायुतीतच आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी थेट भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्राचा आरोप केल्याने मालवणातही राणे विरुद्ध राणे असा वाद रंगलाय.