मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार घडलाय.चालत्या लोकलमध्ये एक खून झाला.रात्री पावणे अकराच्या सुमाराला फर्स्ट क्लासमध्ये जेव्हा गर्दी होती. त्यावेळी गर्दीच्या समोरच लोकलच्या डब्यात चाकू भोकसून खून करण्यात आला. या खूनाचं कारण काय होतं.तर पावसाचं पाणी लोकलच्या डब्ब्यात आत येत होतं.त्यावरुन दरवाजा बंद करण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की चक्क एकाचा खून झाला.पावसाबरोबर लोकलमध्ये रक्ताचे अक्षरशः पाट वाहिले.लोकलमधल्या रक्तरंजित थराराचा हा रिपोर्ट